Wednesday, March 31, 2010

Parshavnath Engineering Collage.Trusty Arrested.

पाश्र्वनाथ इंजिनीअरिंगचा विश्वस्त शहाला अटक आणि सुटका
ठाणे, ३० मार्च/प्रतिनिधी
पाश्र्वनाथ इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शासकीय शुल्कापेक्षा २९ हजार ३०० रुपयांचे अतिरिक्त शुल्क घेतल्याच्या गुन्ह्याखाली कॉलेजचे विश्वस्त टेकचंद जेठालाल शहा याला काल रात्री अटक झाली, तर सफाई कामगारांच्या पगारातील रक्कम आणि पर्यवेक्षकांच्या मानधनाच्या अपहारप्रकरणी त्याला आज जामीन मिळाला. पाश्र्वनाथ इंजिनीअरिंग महाविद्यालयातील भोंगळ कारभार आणि सफाई कामगारांच्या पगारातील अपहारप्रकरणी मनसेचे नेते राजन राजे यांनी संप पुकारला होता. त्यावेळी विश्वस्त शहा व अन्य पदाधिकाऱ्यांना काळे फासून गोंधळ उडाला होता. दोन आठवडे कॉलेज बंद असताना विद्यापीठाने चौकशी सुरू केली. पोलिसांमध्ये महिला कर्मचाऱ्यांनी अश्लील वागणुकीप्रकरणी तक्रारी केल्या होत्या. महाविद्यालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात राजकीय तोफ थंडावल्यानंतर काल बोरीवलीतीत दिलीप गुंजाभाई पटेल यांच्या तक्रारीवरून शहा याला अटक करण्यात आली. शासकीय नियमानुसार इंजिनीअरिंगला ४५ हजार ५७० रुपये शुल्क असताना कॉलेजने विद्यार्थ्यांकडून ७५ हजार रुपये घेतले. पावती मात्र ४५ हजार ५७० रुपयांची दिली. असे बहुतेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलेले आहे. कासारवडवली पोलिसांकडून अटक झाल्यानंतर सिव्हिल रुग्णालयात दाखल झालेला शहा दुपारी जामिनावर सुटला