Saturday, February 27, 2010

‘पाश्र्वनाथ’ च्या संस्थाचालकांवर कारवाईचे आदेश

‘पाश्र्वनाथ’ च्या संस्थाचालकांवर कारवाईचे आदेश
ठाणे , २३ फेब्रुवारी / प्रतिनिधी
ठाण्यातील वादग्रस्त ठरलेल्या पाश्र्वनाथ इंजिनीअरिंग कॉलेजचे विश्वस्त टेकचंद शहा यांच्यावर कोरवाईचे आदेश राज्याचे उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिले. तसेच आवश्यकता भासल्यास कॉलेजवर सरकारी प्रशासक नेमून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यादृष्टिने कॉलेज लवकर सुरू करण्याचे निर्देश शिक्षणमंत्र्यांनी दिले. भाजपाचे आमदार संजय केळकर तसेच मनसेचे नेते राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी आदींनी शिक्षणमंत्र्यांची भेट घेतली. याप्रसंगी मनसेचे सुरेश कोलते, विभाग अध्यक्ष महेश ठाकूर, विक्रांत कर्णिक आदी उपस्थित होते.
शिक्षिकांशी अश्लील वर्तन, शिक्षक, कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर न देणे, विद्यार्थ्यांना त्रास देणे, अवाजवी डोनेशन घेणे, खोटी कागदपत्रे दाखवून शासनाची फसवणूक करणे अशा अनेक पाश्र्वनाथ इंजिनिअरिंग कॉलेज गाजत होते. त्यातच व्यवस्थापनाने कॉलेजला टाळे लावल्यामुळे विद्यार्थी व शिक्षक हवालदिल झाले होते. घोडबंदर रस्त्यावर कासारवडवली येथे असलेल्या या कॉलेजमधून इंजिनीअरिंग, फार्मसी व पॉलिटेक्निक विभागातून साडेतीन हजार विद्यार्थी येथे शिक्षण घेतात तसेच १५० शिक्षक व ७० शिक्षकेतर कर्मचारी येथे कामाला आहेत. कॉलेज सुरू करणारे टेकचंद शहा व व्हाइस प्रिन्सिपल शरद दत्तात्रय शहा ऊर्फ कुमार यांनी काही सहकाऱ्यांना हाताशी धरून काही वर्षांपासून मनमानी कारभार सुरू केला. शरद शहा याच्यावर महिला कर्मचारी, शिक्षकांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप २००१ पासून होत आहे.

No comments:

Post a Comment